मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतींमुळे स्वयंपाकघराचा खर्च वाढला असून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आर्थिक नियोजनावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. या वाढीचा थेट परिणाम बचतीवर होत असून लोकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
किंमती वाढण्याची कारणे
1) सोयाबीनच्या किमतीत झालेली वाढ हे एक महत्त्वाचे कारण आहे.
2) सरकारने खाद्यतेल आयातीवर 20% आयात शुल्क लागू केल्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
3) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या तुटवड्याचा परिणाम देशाच्या तेल दरांवर झाला आहे, ज्यामुळे पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल महाग झाले आहे.
तेलांच्या दरांमध्ये झालेली वाढ
- सूर्यफूल तेल — जुना दर: 120 रुपये प्रति लिटर
नवा दर: 140 रुपये प्रति लिटर - पामतेल — जुना दर: 100 रुपये प्रति लिटर
नवा दर: 135 ते 140 रुपये प्रति लिटर - सोयाबीन तेल — जुना दर: 115 ते 120 रुपये प्रति लिटर
नवा दर: 130 ते 135 रुपये प्रति लिटर
या दरवाढीमुळे स्वयंपाकघरातील खर्च वाढला असून रोजच्या गरजा पूर्ण करणं कठीण झालं आहे.
सरकारकडे जनतेच्या मागण्या
सर्वसामान्य जनतेने सरकारकडे काही उपाययोजनांसाठी मागणी केली आहे.
- आयात शुल्क कमी करणे
- स्वदेशी तेल उत्पादनाला प्रोत्साहन देणे
- महागाई कमी करण्यासाठी सबसिडी लागू करणे
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे केवळ घरगुती बजेट नाही, तर व्यावसायिक क्षेत्रांवरही मोठा परिणाम होत आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक आहे.