मित्रांनो नमस्कार एक महत्त्वाची बातमी आहे खाद्यतेलाच्या किमती आता पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे. नुकतीच नवीन माहिती मिळाली आहे की, क्रूड आणि रिफाइन्ड पाम तेल, सोयाबीन तेल, आणि सनफ्लॉवर तेल यावर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली होती, ज्यामुळे दरात वाढ झाली होती. विशेषता दिवाळीत या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते.
पण ताज्या माहितीनुसार दिवाळीनंतर खाद्यतेल प्रति लीटर 20 ते 30 रुपयांनी स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारतात केवळ 40% खाद्यतेलाची उत्पादन होते, तर उर्वरित 60-65% आयात करावी लागते. केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी 1140 कोटींची तरतूद केली आहे, जेणेकरून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि तेलाच्या किमतीत स्थिरता येईल.
असेही समजते की आयात शुल्कात बदल होणार असल्याने काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नेपाळ आणि सार्क देशांमधून कमी शुल्कात तेल आयात करून ठेवलं आहे. अशा करारामुळे भारतीय ग्राहकांवर भार पडत आहे, तर कंपन्या पण नफा मिळवत आहेत.
दिवाळीनंतर खाद्यतेलाची मागणी कमी होणार आहे आणि खाद्यबियांचे पीक बाजारात येण्याची शक्यता आहे. यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर मित्रांनो या बदलांचा आपल्या खरेदीवर काय परिणाम होतो हे पाहूया.