नमस्कार खाद्यतेलांच्या किमतींबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 8 ते 9 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये ही पहिलीच मोठी घसरण असेल. मागील दोन आठवड्यांमध्ये सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या किमती प्रति टन सुमारे 100 ने कमी झाल्या आहेत.
किंमतीतील घसरणीची कारणे
1) सोयाबीन तेल – सोयाबीन उत्पादनात जागतिक स्तरावर झालेली वाढ ही सोयाबीन तेलाच्या किमती कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
2) सूर्यफूल तेल – सूर्यफूल तेलाच्या किमती तुलनेने स्थिर होत्या.
3) पाम तेल –पाम तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामागे इंडोनेशियाचा बायोडिझेल धोरणाशी संबंधित निर्णय विलंबित होणे हे मुख्य कारण आहे.
इंडोनेशिया जो पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे, बायोडिझेलमध्ये पाम तेलाचे मिश्रण 35% वरून 40% करण्याचा प्रस्ताव सादर करत होता. मात्र, पर्यावरणवादी गटांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव थांबवण्यात आला आहे. यामुळे पाम तेलाची मागणी घटली असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.
किंमतीतील बदल
- सूर्यफूल तेल : 1300 वरून 1200
- सोयाबीन तेल : 1230 वरून 1130
- पाम तेल : 1320 वरून 1220
सनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया यांनी ही माहिती दिली आहे.
भारतीय ग्राहकांवर परिणाम
भारत दरवर्षी 14.5 ते 15 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतो, जे देशांतर्गत मागणी पूर्ण करते. किमती कमी झाल्यामुळे भारतीय ग्राहकांना विशेषता किरकोळ बाजारात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.