मंडळी सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचा उत्साह उफाळून येतो. या काळात अनेकांना बोनस मिळत असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीला जोर येतो. परंतु यंदाच्या सणासुदीच्या तोंडावर सामान्य लोकांच्या खिशावर आणखी मोठा ताण पडण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या तयारीत असलेल्या लोकांना आता महागाईनेही त्रस्त केले आहे. विशेषत: सणाच्या काळात गोड आणि फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात, त्यातच खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणीत आणले आहे.
सोन्याच्या दरात अचानकपणे मोठी घसरण , जाणून घ्या आजचे दर
खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतींसाठी केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे, जरी आयात शुल्क कमी असतानाही या वाढीचे कारण विचारले आहे. सरकारने तेल कंपन्यांना सूचित केले आहे की आयात केलेल्या खाद्यतेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून किंमती स्थिर ठेवणे आवश्यक आहे, मात्र तरीही किंमती वाढताना दिसत आहेत. यापूर्वी, १४ सप्टेंबर रोजी सरकारने देशांतर्गत तेलबिया उत्पादनांना आधार देण्यासाठी काही खाद्यतेलांवर सीमा शुल्क वाढवले होते. पण १७ सप्टेंबर रोजी अन्न मंत्रालयाने खाद्यतेल उद्योगातील प्रमुख कंपन्यांशी बैठक घेऊन किरकोळ किंमतीत वाढ होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते.
अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सणासुदीच्या काळात किरकोळ किंमतीत नरमाई ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही आयात शुल्क वाढविल्यानंतर दर वाढत आहेत, याबाबत कंपन्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. मंत्रालयाने कंपन्यांना स्पष्ट केले आहे की कमी शुल्कात आयात केलेला साठा ४५ ते ५० दिवसांपर्यंत पुरेसा आहे, त्यामुळे दर वाढवणे आवश्यक नाही.
E-Pik Vima Grant : खुशखबर ! या शेतकऱ्यांना मिळणार ई-पीक विम्याचे अनुदान , पहा जिल्हानिहाय यादी
मित्रानो ताज्या आकडेवारीनुसार शेंगदाण्याचे तेल १८० रुपयांवरून १८६ रुपये प्रति लिटर झाले आहे, मोहरीचे तेल १४२ रुपयांवरून १४८ रुपये, वनस्पती तेल १२२ रुपयांवरून १२६ रुपये प्रति लिटर महागले आहे. या दरांमध्ये अजूनही किरकोळ बाजारात फरक दिसू शकतो.
सरकारच्या अहवालानुसार सणांच्या काळात मागणी वाढल्यामुळे खाद्यतेलांच्या दरात सुमारे ८% वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोयाबीन तेल ११८ रुपयांवरून १२६ रुपये प्रति लिटर झाले, तर पाम तेल १०० रुपयांवरून १०७ रुपये, आणि सूर्यफूल तेल ११९ रुपयांवरून १२६ रुपये प्रति लिटरपर्यंत महागले आहे.