मंडळी केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे विविध लाभ दिले जातात. विशेषता, कार्डधारकाच्या मृत्यूस २ लाख रुपयांपर्यंत तर अपघाती अपंगत्वासाठी १ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.
ई-श्रम कार्डचे फायदे
1) अपघात झाल्यास १ ते २ लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा.
2) केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी पात्रता.
3) अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होण्याची संधी.
4) भविष्यात पेन्शन योजनांचा समावेश होऊ शकतो.
5) कामगारांसाठी रोजगार संधी निर्माण करण्याचा प्रयत्न.
ई-श्रम कार्ड साठी पात्रता
- असंघटित क्षेत्रातील कामगार
- वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान
- EPFO किंवा ESIC सदस्य नसलेले
- आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक
ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया (2025)
1) अधिकृत संकेतस्थळावर जा https://eshram.gov.in
2) रजिस्ट्रेशन वर क्लिक करा
3) आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक व OTP टाका
4) EPFO आणि ESIC सदस्यत्व माहिती भरा
5) वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा – जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, व्यवसाय इत्यादी
6) बँक खाते माहिती द्या
7) सर्व माहिती तपासून सबमिट करा
8) ई-श्रम कार्ड डाउनलोड करा व प्रिंट करून ठेवा
ई-श्रम कार्ड ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया
जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नसेल, तर नजीकच्या CSC (Common Service Center) केंद्रात जाऊन आधार कार्ड, आधार लिंक केलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खाते माहिती देऊन नोंदणी करू शकता. CSC ऑपरेटर तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला ई-श्रम कार्ड उपलब्ध करून देईल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड
- व्यवसाय संबंधित माहिती
ई-श्रम कार्ड नोंदणी केल्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ई-श्रम पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी आणि या योजनेचा फायदा घ्यावा.