E-Pik Vima Grant : मागच्या वर्षी मराठवाडा आणि काही ठिकाणी खूप कमी पाऊस पडला, यामुळे सोयाबीन, कापूस लागवडीला मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांचे अनुदान वितरीत करणे सुरु होणार आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी खूप काही योजना अमलात आणत आहे.
जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांना प्रती हेक्टरी १० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
lek Ladki Yojana : या योजनेअंतर्गत सरकार देणार प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, असा करा अर्ज
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू करण्याच्या आधीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ६६८ कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे. पीक विमा जमा करण्याचे काम कृषी विभागाने युद्धपातळीवर सुरु केले आहे.
१९ सप्टेंबर रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली होती. आणि त्यांनी म्हटले का मराठवाड्यातील आठ जिल्यातील याद्या लवकर तयार करा.
कोणते शेतकरी अपात्र राहणार
ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक विमा भरलेला नव्हता ते शेतकरी या योजनेला अपात्र ठरणार आहे. म्हणून जेव्हा पण सरकार अशा काही सूचना देत असतात, त्या सूचनेचे पालन शेतकऱ्यांनी करायला हवे. खूप असे शेतकरी आहे ज्यांनी ई-पीक विमा भरलेला नव्हता, असे शेतकरी या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार आहे.