सध्याच्या काळात वाहन चालवताना योग्य पादत्राणे घालणे ही एक अत्यंत कामाची गोष्ट आहे, परंतु अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जात असते. अलीकडेच सोशल मीडियावर याविषयी एक चर्चा रंगली होती ती म्हणजे लुंगी, बनियान किंवा चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड होतो का ? या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या विषयाची सखोल माहिती आणि त्याचे विविध पैलू आज आपण समजून घेऊया.
वाहन चालवताना पादत्राणांचे महत्त्व
वाहन चालवताना योग्य पादत्राणांची निवड ही केवळ आरामदायी नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेची आहे. विशेषता दुचाकी चालवताना चप्पल किंवा स्लीपर्स घालणे हे धोकादायक ठरू शकते. कारण अपघात झाल्यास पायाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता यामुळे वाढते. याशिवाय गिअर बदलताना देखील चप्पल घातल्यामुळे अडचणी येऊ शकतात.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदी
2019 मध्ये केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नवीन कायद्यानुसार वाहन चालवताना अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार दुचाकीवरील चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. पादत्राणांबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आली नाही.
नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
या संपूर्ण चर्चेवर प्रकाश टाकताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवल्यास कुठलाही दंड आकारल्या जाणार नाही. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पादत्राणे वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
अपघात प्रतिबंधात्मक उपाय
वाहन चालवताना योग्य पादत्राणांचा वापर हा अपघात प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे.
योग्य पादत्राणे वापरल्याने
1) पायाला पूर्ण संरक्षण भेटते
2) वाहनातील वेगाचे नियंत्रण चांगले राहत
3) दुर्दैवाने अपघात झाल्यास दुखापत कमी होते
4) गीअर बदलताना सोयीस्कर होते
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाहन चालवताना घाई करणे स्वाभाविक असले तरीदेखील सुरक्षेशी तडजोड करणे हे योग्य नाही. योग्य पादत्राणांचा वापर हा लहान पण महत्त्वाचा निर्णय आहे जो आपल्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्रत्येक वाहनचालकाने सुरक्षित वाहन चालवण्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे तसेच योग्य पादत्राणांचा वापर सुद्धा त्यांनी करावा.