‘पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल डाऊनलोड करताच खात्यातून तब्बल २ कोटी ४८ लाख १५६ रुपये गायब

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
crime alert

‘पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल डाऊनलोड करताच एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून तब्बल २ कोटी ४८ लाख १५६ रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अविनाश रोतळे (वय ३६) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकारे जर कोणीही तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ॲप्स ची लिंक पाठवीत असेल तर त्या व्यक्तीला तुरंत ब्लॉक करा, या लिंक वर क्लिक करू नका, अन्यथा तुमचे बँक खाते खाली होईल.

दत्त मंदिर, कुंभारवाडा परिसरात राहणारे अविनाश रोतळे हे एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आहेत. त्यांना या ग्रुपवर ‘पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल प्राप्त झाली होती. पीएम किसान योजनेशी संबंधित माहिती किंवा इतर बाबींशी निगडित हे अॅप असावे, असा समज रोतळे यांचा झाला.

त्यातूनच त्यांनी फाइलवर क्लिक करून ती आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून घेतली. त्यानंतर हे अॅप त्यांनी रीतसर इन्स्टॉल देखील केले. त्यानंतर काही वेळातच भामट्यांनी मोबाइलवर ताबा मिळवीत त्यांच्या खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळते केले.

‘कोणतीही App ची लिंक ओपन करू नका’

‘पीएम किसान डॉट एपीके’ अशा प्रकारच्या कोणत्याही अॅपची लिंक ओपन करू नये, असे आवाहन या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केले आहे. पीएम किसानच्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी शासनाचे पोर्टल आहे. त्यावरून अपेक्षित माहिती मिळविण्याचा प्रयत्न करावा, असेही विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी सांगितले.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.