मंडळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांनी पिक विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे. क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते.
प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करा. ॲप उघडल्यावर Continue without Loginपर्याय निवडून Crop Loss या पर्यायावर टच करा. त्यानंतर Crop Loss Intimation पर्याय निवडा.
तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपीद्वारे सत्यापन करा. त्यानंतर पिकाची संपूर्ण माहिती भरा. हंगामासाठी रब्बी निवडा, योजनेसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना निवडा आणि राज्यासाठी महाराष्ट्र निवडा. पॉलिसी क्रमांक असल्यास, तो प्रविष्ट करा.
ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याचा पर्याय निवडून, प्रकार (उदा., पावसामुळे नुकसान) आणि नुकसान झाल्याची तारीख भरावी. पिकाची स्थिती (उभे पिक, कापणी केलेले किंवा गोळा करून ठेवलेले) स्पष्ट करा.
नुकसानीचे फोटो आणि व्हिडीओ काढून ॲपमध्ये अपलोड करा व अर्ज सबमिट करा. ही प्रक्रिया काळजीपूर्वक आणि वेळेवर पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी मदत मिळेल.