पीक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स … पहा कोणती तारीख दिली आहे

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
crop insurance fixed date

मित्रांनो खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम स्वरूपात मदत देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने घेतला आहे.

नुकसानभरपाई तत्काळ वितरित होणार

भारतीय कृषी विमा कंपनीला तातडीने नुकसानभरपाई वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, बीड जिल्ह्यातील ६.५९ लाख शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा अग्रिम मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना कशामुळे नुकसानभरपाई मिळणार?

१ जून २०२४ नंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पेरण्या केल्या होत्या आणि पीक विमा योजनेंतर्गत सहभागही नोंदवला होता. १ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ दरम्यान १७.१४ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पण जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले.

२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. परिणामी, पिके पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत २५% पेक्षा अधिक नुकसानीच्या तक्रारींचे संकलन करण्यात आले. त्यानंतर सॅम्पल सर्व्हेचे आदेश देण्यात आले आणि विमा क्षेत्राचा अहवाल तयार करण्यात आला.

जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

संयुक्त समितीच्या चर्चेनंतर सर्वेक्षण अहवालास मंजुरी देण्यात आली. परिणामी, मंजूर शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश विमा कंपनीला देण्यात आले.

कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार?

बीड जिल्ह्यातील ६.५९ लाख शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळणार आहे, तर २.४४ लाख शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणानुसार विमा रक्कम वितरित केली जाणार आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील ५५,७१४ शेतकऱ्यांना विमा अग्रिम मिळणार आहे, तर १०,५७६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आष्टीमध्ये १९,४४३ शेतकऱ्यांना अग्रिम आणि ५५,०७८ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल. बीड तालुक्यात ९३,७१६ शेतकरी अग्रिमसाठी पात्र असून ४२,९७३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल. धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी या तालुक्यांतील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

निधी कधी मिळणार?

जिल्हा संनियंत्रण समितीच्या मंजुरीनंतर विमा कंपनीकडून याद्या मुख्य कार्यालयास पाठवण्यात आल्या आहेत. शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निधी वितरित केला जाईल.

बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप २०२४ मधील नुकसानभरपाई मिळणार आहे. शासनाच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळेल.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.