नमस्कार मित्रांनो गेल्या हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 20,000 रुपये या योजनेतून मदत मिळू शकते. 30 सप्टेंबरपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत.
योजनेची पार्श्वभूमी
गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना बाजारभावातील घसरण आणि दुष्काळामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी एकूण 4,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा लाभ आधार लिंक केलेल्या आणि पात्र शेतकऱ्यांना दिला जात आहे.
आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान
कापूस आणि सोयाबीन अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केली जात आहे. तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
आधार लिंकिंग स्टेटस तपासण्याची पद्धत
1) सर्वप्रथम आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जा: https://uidai.gov.in.
2) माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.
3) ड्रॉपडाऊन मेनूमधून आधार सेवा निवडा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्टेटस तपासा पर्यायावर क्लिक करा.
5) तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
6) तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो टाका.
7) तुमचा आधार सिडिंग स्टेटस अक्टिव आहे की नाही, आणि कोणत्या बँकेशी ते लिंक आहे हे तुम्हाला दिसेल. जर आधार सिडिंग स्टेटस अक्टिव नसेल, तर ते अक्टिव करून घ्या.
राज्यातील अंदाजे 96 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. आधार लिंकिंग प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहिती पूर्ण झाल्यानंतर, टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे वितरित केले जातील.