नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. खरीप हंगाम 2020 पासून कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याची वेळ जवळ आली आहे.
राज्य सरकारकडून अनेक वेळा तारीख वाढवण्यात आल्या होत्या. अखेर सरकारने जाहीर केले होते की, 29 सप्टेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल. पण तसे झाले नाही. आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे की सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा करण्यास सुरुवात होईल.
राज्यातील सुमारे 65 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होईल. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे, ज्याची कमाल मर्यादा 10,000 रुपये असेल. अशा प्रकारे, दोन हेक्टरपर्यंतचे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
धनंजय मुंडे यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सुमारे 500 कोटी रुपये वितरित करण्यात येतील. राज्य सरकारने या संदर्भात आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे, आणि शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या खात्यांमध्ये अनुदान जमा झाल्याचे तपासण्यासाठी आपली माहिती तपासावी.