राज्याच्या कृषी क्षेत्रामधील एक महत्वाची घडामोड म्हणजे सध्याच जाहीर झालेली कापूस आणि सोयाबीन अनुदान योजनेची लाभार्थी यादी. या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. आजच्या या लेखात आपण या योजने विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना राबवली आहेत. कापूस व सोयाबीन ही महत्वाची नगदी पिके आहेत, या पिकांच्या उत्पादनामध्ये मोठा खर्च येतो. शेतकऱ्यांना या खर्चाची भरपाई करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्थिरतेसाठी ही अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.
लाभार्थी यादीबद्दल महत्वाची माहिती
यादी पाहण्याची सुविधा
1) सर्व शेतकऱ्यांना आता मोबाईलवरून लाभार्थी यादी पाहता येणार आहे
2) यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे
3) शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची सहज तपासणी करता येणार आहे
आवश्यक कागदपत्रे
1) 7/12 उतारा
2) आधार कार्ड
3) बँक पासबुक
4) आधार लिंक मोबाईल क्रमांक
यादी पाहण्याची प्रक्रिया
पहिला टप्पा –
1)पोर्टलवर जाऊन लॉगिन करा
2)आपला मोबाईल नंबर नोंदवा
3) OTP द्वारे प्रमाणीकरण करा
दुसरा टप्पा –
1) जिल्हा निवडा
2) तालुका निवडा
3) गाव निवडा
4) 7/12 वरील नंबर टाका
तिसरा टप्पा
1) यादी तपासणे
2) आपले नाव शोधा
3 अनुदानाची रक्कम पहा
4) स्थिती तपासा
कापूस व सोयाबीन अनुदान योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची संधी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपली नावे यादीमध्ये तपासावीत व आवश्यक ती कागदपत्रे तयार करून ठेवावीत. डिजिटल माध्यमातून ही प्रक्रिया सोपी झाली असून, घरबसल्या याविषयी माहिती मिळू शकते.