Cotton Market Price : महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड केली जाते आणि आता कपाशीची आवक कमी आहे तसेच कपाशीला सात हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे परंतु पुढील काही दिवसांमध्ये कपाशीची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण जगभराचा विचार केला तर चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा कापूस उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक लागतो आणि त्यामुळे कपाशीला “सफेद सोन” असं देखील म्हटलं जाते आणि मागील वर्षाचा विचार केला तर त्या तुलनेत यावर्षी कापूस उत्पादनांमध्ये वाढ झालेली बघायला मिळत आहे. आयात आणि निर्यात मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सहा टक्के जास्त वाढ या वर्षी बघायला मिळण्याची शक्यता आहे.
यावर्षी अकोला बाजारपेठेमध्ये कापसाचे दर किमान हमीभावापेक्षा जास्त आहेत आणि मागील दोन वर्षांच्या दराचा विचार केला तर 2022 मध्ये 8762, 2023 मध्ये 7075 रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला प्राप्त झाला होता. कृषी विभाग अंतर्गत स्मार्ट प्रकल्पामध्ये पुढील काही दिवसांमध्ये कापसाचे कसे दर राहतील याची माहिती देण्यात आलेली आहे.
कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पातील माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 च्या दरम्यान कापसाचे दर 7500 ते 8500 रुपये प्रतिक्विंटल च्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
अंदाजीत बाजार भाव मांडत असताना तज्ञांनी हे बाजारभाव विविध घटकांवरती अवलंबून असतात याबद्दल माहिती सांगितली आहे जसे की सरकारी धोरण, हवामान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आर्थिक घटक यामुळे कापसाच्या बाजारपेठेवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे कापसाचे बाजार भाव कमी जास्त होऊ शकतात. तज्ञ मार्फत देण्यात आलेल्या अहवालाचा शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर करावा असा सल्ला देण्यात आलेला आहे.