मंडळी सामान्य जनता आधीच महागाईच्या वाढलेल्या भाराने त्रस्त आहे. सणासुदीचा काळ जवळ आला की, महागाई आणखी वाढणार का, याची चिंता लोकांना सतावते. अशातच सरकारने प्रमुख तेल विपणन कंपन्यांसोबत सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस)च्या किमतीत वाढ करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. कारण दिवाळीच्या तोंडावर महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.
4 ते 6 रुपये वाढीची शक्यता
सध्या सीएनजीच्या दरवाढीवर चर्चा सुरू आहे, आणि किंमतीत 4 ते 6 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने शहरी रिटेलर्सना नैसर्गिक गॅसचा पुरवठा 20% कमी केला आहे, ज्याचा परिणाम तेलाच्या किमतींवरही होऊ शकतो. याशिवाय, इंधनाच्या किंमतींवरील एक्साईज ड्युटीमध्ये घट केल्याने किमतींवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
पुरवठ्यात घट
सीएनजीच्या किमती थेट सरकार ठरवते. सध्या नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यात वार्षिक 5% घट होत आहे, ज्याचा परिणाम शहरी रिटेल विक्रेत्यांवरही दिसून येत आहे. पुरवठा कमी असल्याने सीएनजीच्या किमतींवर ताण येऊ शकतो, आणि पुढील काळात इंधनाच्या किंमतींवर दबाव राहू शकतो.
सीएनजी दरवाढीची कारणे
सीएनजीच्या दरवाढीमागे काही कारणे आहेत. मे 2023 मध्ये सीएनजीची मागणी 90% होती, जी 16 ऑक्टोबर 2024 रोजी घटून 50.75% झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ही मागणी 67.74% होती. या घटलेल्या मागणीमुळे सीएनजीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत विक्रेत्यांना किमती वाढवण्याची गरज भासू शकते.या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून, सामान्य लोकांना आणखी महागाईचा सामना करावा लागू शकतो, विशेषता सणासुदीच्या काळात.