नमस्कार आजकाल महिला उद्योजकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे, तरीही अनेक महिला उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्यास असमर्थ ठरतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरे भांडवल. महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल मिळवणे कठीण होते, ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महिलांसाठी विशेष स्मॉल बिझनेस लोन स्कीम सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनवणे आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांच्या भागीदारीला प्रोत्साहन देणे आहे.
महिला उद्योगिनी योजना – एक महत्त्वाची पाऊल
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली बँकांनी महिला उद्योगिनी योजना सुरू केली आहे. यानुसार महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, तेही कोणत्याही जामिनाशिवाय. या कर्जाचा उपयोग विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे महिलांना आपला व्यवसाय उभा करता येतो आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात.
कर्जाचा उपयोग कोणत्या व्यवसायांसाठी करता येईल?
महिला उद्योजकांसाठी या योजनेतून मिळालेल्या कर्जाचा उपयोग विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी केला जाऊ शकतो. काही उदाहरणे खालीलप्रमाणे.
- बांगड्या बनविणे
- ब्युटी पार्लर चालवणे
- बेडशीट, टॉवेल आणि बुक बाईडिंग यांसारख्या वस्तू तयार करणे
- कॉफी आणि चहा उत्पादन
- कापूस उत्पादन, रोपवाटिका, कापड व्यवसाय
- दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय
- डायग्नोस्टिक लॅब्स, ड्रायक्लीनिंग व्यवसाय
- सुक्या मासळीचा व्यवसाय
- खाद्यतेलाचे दुकान
- स्मार्ट पापड निर्मिती
याशिवाय अनेक इतर व्यवसायांसाठी देखील या कर्जाचा वापर होऊ शकतो. विशेषता३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्यासाठी उपलब्ध आहे.
अर्ज कसा करावा आणि कोणत्या बँकांमध्ये?
महिला उद्योगिनी योजना या कर्जासाठी महिलांना राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमध्ये अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर, बँक त्या अर्जाची पडताळणी करते आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते.
केंद्र सरकारच्या या स्मॉल बिझनेस लोन स्कीमच्या माध्यमातून महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल सहज उपलब्ध होऊ शकते. यामुळे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोठा हातभार लागेल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत मिळेल.