Bsnl Tower मंडळी आता तुमच्या घरावर बीएसएनएलचा टॉवर बसवून तुम्ही महिन्याला २० ते २५ हजार रुपये कमावू शकता. पण बऱ्याच जणांना प्रश्न असतो की यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती काय आहे. चला त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
बीएसएनएल टॉवरची मागणी का वाढली?
सध्या देशभरात बीएसएनएलचे टॉवर कमी प्रमाणात आहेत कारण पूर्वी बीएसएनएलचे नेटवर्क इतके विस्तृत नव्हते, तर जिओ आणि एअरटेलच्या टॉवरने मार्केटमध्ये वाढ मिळवली होती. परंतु सध्या जिओ आणि एअरटेलच्या रिचार्जचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, ज्यामुळे अनेक लोक पुन्हा बीएसएनएलकडे वळत आहेत. यामुळे बीएसएनएलला सर्व भागांमध्ये टॉवर स्थापित करणे गरजेचे झाले आहे आणि त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट सुरु केली आहे.
टॉवर बसवण्यासाठी योग्य ठिकाण
बीएसएनएल दोन प्रकारचे टॉवर बसवते
1) तुमच्या शेतजमिनीवर किंवा गुठ्यामध्ये.
2) गावाच्या बाहेर असलेल्या जागेवर किंवा घरावर.
जर तुमची जागा गावाच्या बाहेर असेल, तर तुम्ही टॉवर बसवण्यासाठी अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा?
1) अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/about_us/about_btcl.html
2) लिंकवर गेल्यावर तुमच्या लोकेशनची माहिती निवडा, ज्यामुळे बीएसएनएल कंपनीला तुमच्या भागाबद्दल माहिती मिळेल.
3) तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि संपूर्ण पत्ता भरा.
4) त्यानंतर दिलेल्या मॅपवर तुमच्या जागेचे लोकेशन चिन्हांकित करा.
5) सगळी माहिती पूर्ण करून अर्ज सबमिट करा.
अर्ज सादर केल्यानंतर बीएसएनएल तुमच्या अर्जावर विचार करेल. जर तुमची जागा आणि इतर अटींना योग्य ठरली, तर तुम्ही बीएसएनएलचा टॉवर बसवून दर महिन्याला चांगले उत्पन्न कमवू शकता.