मंडळी आजच्या डिजिटल युगात बँकिंग आणि इतर अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. एस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने काही नवे नियम लागू केले आहेत आणि काही विशिष्ट खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एस बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.
तुमचे या बँकांमध्ये खाते असेल, तर तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर जाऊन नवीन नियम व खात्यांबाबतची माहिती घेण्याचा सल्ला दिला जातो.
एस बँकेचे नवीन नियम
एस बँकेने बचत खात्यांच्या किमान शिल्लक रकमेतील बदलांची घोषणा केली आहे.मित्रानो उदाहरणार्थ प्रोमॅक्स खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक आता 50,000 रुपये असावी लागेल. खात्यांवरील शुल्काची कमाल मर्यादा 1,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात बचत एक्सक्लुसिव्ह खाते आणि एस सेविंग सिलेक्ट खाते यांचा समावेश आहे. हे खाते ग्राहकांच्या विशिष्ट गरजांसाठी सुरू करण्यात आले होते, पण आता ती बंद करण्यात येत आहेत.
आयसीआयसीआय बँकेचे नवीन नियम
आयसीआयसीआय बँकेने देखील अनेक सेवांवरील शुल्क आणि नियम बदलले आहेत. डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क आता 2,000 रुपये असेल, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हे शुल्क 99 रुपये ठेवण्यात आले आहे.
एका वर्षात 25 पाने असलेल्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, पण 25 पाने पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच आयएमपीएस (IMPS) व्यवहारांसाठी शुल्क लागू करण्यात आले आहे, जे 2 रुपये ते 15 रुपये दरम्यान असेल.
या बदलांमुळे बँकिंग सेवा अधिक सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न बँकांनी केला आहे. जर तुमचे खाते या बँकांमध्ये असेल, तर या नवीन नियमांनुसार आवश्यक त्या बदलांची माहिती घेणे आणि आपल्या खात्याचा आढावा घेणे गरजेचे आहे.