मित्रांनो राज्यातील आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ नागरिकांनाच नव्हे, तर आधार केंद्र चालविणाऱ्यांनाही थेट फायदा होणार आहे. नेमका निर्णय काय आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे आणि यामागील उद्देश काय आहे – हे आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
आधार कार्डचे महत्त्व आणि नवीन बदल
आधार कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी अत्यावश्यक ओळखपत्र बनले आहे. राज्यात किंवा देशभर प्रवास करताना ओळख पटवण्यासाठी आधार अत्यंत उपयुक्त ठरते. गेल्या काही वर्षांमध्ये आधार संदर्भात विविध सुधारणा करण्यात आल्या असून, आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नवीन आधार संचांचे वितरण सुरू
राज्यातील आधार केंद्र चालकांकडून अनेक वर्षांपासून आधार नोंदणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत नवे आधार संच आता वितरित केले जात आहेत.
या उपक्रमाची सुरुवात मुंबई व उपनगर जिल्ह्यातून झाली असून, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते नवीन संचांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला विभागाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मानधनात मोठी वाढ – नोंदणीसाठी आता ५० रुपये
या उपक्रमात आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला, तो म्हणजे आधार केंद्र चालकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ. यापूर्वी एका आधार नोंदणीसाठी फक्त २० रुपये मिळत होते, ते आता थेट ५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक नोंदणीमागे चालकांना ३० रुपयांची अधिक रक्कम मिळणार आहे.
आधार नोंदणीचा आलेख
राज्यात आतापर्यंत एकूण १२ कोटी ८० लाख आधार नोंदण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये ० ते ५ वयोगटातील मुलांच्या नोंदणीचे प्रमाण तब्बल ३९% आहे. हे दर्शवते की सरकारने लहान मुलांच्या आधार नोंदणीसाठीही विशेष लक्ष दिले आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय केवळ तांत्रिक सुधारणा करणारा नाही, तर आधार केंद्र चालकांचा प्रोत्साहन वाढवणारा आहे. नागरिकांसाठीही हे अधिक सोयीचं आणि जलद सेवा मिळवण्याचं माध्यम ठरणार आहे.