मंडळी महाराष्ट्र खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल म्हणाले आहे की तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असल्याने मागील वर्षी पासून शेंगदाणा तेलाच्या किंमतीमध्ये घट होताना पाहायला मिळतेय. येत्या काळात आपल्याला या दरात आणखी घसरण होताना पाहायला मिळेल.
मित्रांनो सध्याच्या बाजारातील तेलाच्या किंमती वर नजर टाकली असता 20 ते 30 रुपयांची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे घरगुती किचनचा बजेट विस्कटला होता.
राज्यसरकारने नुकतीच एक महत्त्वाची अधिसूचना जारी केलेली आहे. या अधिसूचनेनुसार, खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सहा टक्के इतकी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये सहा टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजारातील प्रमुख खाद्यतेल ब्रँड कंपनी यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉर्च्युन ब्रँडचे मालक ईडन चिल्मर यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये 5 रुपये प्रति लीटरने कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी डबल आणि फॅट्स इंडिया यांनी 10 रुपये प्रति लीटरने खाद्य तेलाच्या किंमती कमी केल्या आहेत.
या निर्णयामागे अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. विभागाने आपल्या सदस्यांना ग्राहकांच्या फायद्यासाठी खाद्यतेलांवरील किंमती कमी करण्याचा सल्ला दिलेला होता. त्यानुसार अनेक खाद्यतेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली पोस्ट आवडली असेल तर आजच आपल्या मित्रांसोबत शेअर करा.