मंडळी डिजिटल क्रांतीनंतर देशभरातील बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाइन होत असले तरी, अजूनही रोख व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा बाजारात जीर्ण किंवा फाटलेल्या नोटा दिसतात, आणि अशा नोटा स्वीकारण्यावरून दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद होतात. तुमच्याकडेही अशा फाटलेल्या नोटा असतील तर काळजी करू नका – कारण तुम्ही त्या सहज बदलून घेऊ शकता.
आरबीआयच्या बँक नोट एक्सचेंज मेळाव्या ची सुविधा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आर्थिक साक्षरता आणि क्लीन नोट धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बँक नोट एक्सचेंज फेअर किंवा बँक नोट एक्सचेंज मेळावे आयोजित करते. या मेळाव्यांमध्ये RBI आणि इतर बँकांचे अधिकारी ग्राहकांना फाटलेल्या किंवा जीर्ण नोटा बदलून देतात.
या मेळाव्यात कोणत्या सेवा मिळतात?
- फाटलेल्या आणि जीर्ण नोटा नवीन नोटा किंवा नाण्यांमध्ये बदलण्याची सुविधा
- आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन
- डिजिटल फसवणुकीपासून बचावाचे उपाय
बँकेमधूनही बदलता येतील फाटलेल्या नोटा
जर तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहू शकत नसाल, तर तुम्ही बँका किंवा RBI कार्यालयांमध्येही फाटलेल्या आणि जुन्या नोटा बदलू शकता.
- बँकेत दररोज ₹५,००० मूल्याच्या २० नोटा मोफत बदलता येतात.
- २० पेक्षा जास्त नोटा किंवा ₹५,००० पेक्षा जास्त रकमेच्या नोटा बदलायच्या असतील, तर बँक त्या पावतीच्या आधारावर स्वीकारते आणि काहीवेळा सेवा शुल्क आकारू शकते.
फाटलेल्या नोटा टाळा – योग्य सुविधा वापरा
यापुढे आरबीआयचा बँक नोट एक्सचेंज मेळावा आपल्या शहरात आयोजित झाला तर त्याचा नक्की लाभ घ्या आणि तुमच्या जीर्ण नोटा नवीन नोटांमध्ये बदलून घ्या.