भारतीय रिझर्व्ह बँकेची सूचना : ऑक्टोबरमध्ये तब्बल इतके दिवस बँका राहणार बंद

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Updated on:

Follow Us
bank holiday

कोणताही सण म्हटले का पैशाची उधळपट्टी करणे. ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी सारखे मोठे सण येत असल्याने तुमचा खिसा खाली होणार , यासाठी आधीच पैशाचे नियोजन करून गैरसोय होणे टाळू शकता.

दसरा, दिवाळीसह इतर सण, उत्सव व साप्ताहिक सुट्या यांमुळे ऑक्टोबर २०२४ मध्ये बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्या सर्व राज्यांत नसतील. राज्यानुसार सण भिन्न असल्यामुळे सुट्यांची संख्याही भिन्न असेल.

सुट्या लक्षात घेऊन आपल्या आर्थिक कामांचे नियोजन नागरिकांनी करावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह
बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. ऑक्टोबरमधील सुट्यांत शनिवार- रविवार, जम्मू-काश्मिरातील विधानसभा निवडणूक, गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजन, काटी बिहू यांचा समावेश आहे.

सुट्यांच्या काळात यूपीआय, नेट बँकिंग अथवा मोबाइल बँकिंग व एटीएम सेवा सुरू राहील.

कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात सुट्टी?

तारीख सुट्टी व राज्य
१ ऑक्टोबरविधानसभा निवडणूक (जम्मू)
२ ऑक्टोबरगांधी जयंती (देशभर )
३ ऑक्टोबरनवरात्र स्थापना ( जयपुर )
६ ऑक्टोबररविवार (देशभर )
१० ऑक्टोबरदुर्गापूजा, दसरा, महासप्तमी (आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता)
११ ऑक्टोबरदसरा, महाअष्टमी, महानवमी इ. (आगरतळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, ईटानगर, कोहिमा, कोलकाता, पाटणा, रांची आणि शिलाँग)
१२ ऑक्टोबरदसरा, विजयादशमी, दुर्गापूजा (जवळपास संपूर्ण देशात)
१३ ऑक्टोबररविवार (देशभर )
१४ ऑक्टोबरदुर्गापूजा, दासेन (गंगटोक)
१६ ऑक्टोबरलक्ष्मीपूजन आगरतळा, कोलकाता)
१७ ऑक्टोबरमहर्षी वाल्मीकी जयंती व काटी बिहू (बंगळुरू, गुवाहाटी
२० ऑक्टोबररविवार (देशभर )
२६ ऑक्टोबरचौथा शनिवार (देशभर)
२७ ऑक्टोबररविवार (देशभर )
३१ ऑक्टोबरदिवाळी (देशभर)
Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.