भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही (RBI) नेहमीच पुढाकार घेत असते. अलीकडेच, RBI चे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली काही महत्त्वपूर्ण नियम जाहीर करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमांचा मुख्य उद्देश आहे बँकिंग क्षेत्रामधील फसवणूक रोखणे व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.
एकाच व्यक्तीच्या अधिक बँक खात्यावर कडक नजर
आजच्या काळामध्ये बऱ्याच नागरिकांकडे एकापेक्षा जास्त बँकेत खाते असणे सामान्य झाले आहे. आता या बँक खात्यांच्या वापरावर आता RBI ने विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. नव्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या अनेक खात्यांमधील व्यवहारांची अधिक तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद किंवा अनियमित व्यवहार आढळून आले तर , संबंधित खाते तात्काळ गोठविण्यात येईल व दंडात्मक कारवाई केली जाईल.
दंडात्मक तरतुदी व आर्थिक शिस्त
RBI ने आर्थिक शिस्त लावण्याकरिता कडक दंडात्मक तरतुदी केलेल्या आहेत. अनियमित व्यवहारांसाठी १०,००० रुपयांपर्यंतचा दंड यामध्ये आकारण्यात येऊ शकतो. हा दंड केवळ नियम मोडला म्हणून शिक्षा नसून, आर्थिक शिस्त लावण्यासाठीचे एक चांगले साधन आहे. दंडाची रक्कम ही बँक व्यवहाराचे स्वरूप व अनियमिततेच्या गांभीर्य यानुसार ठरविले जाईल.
बँकांची याविषयी वाढलेली जबाबदारी
नवीन नियमांमुळे बँकांच्या जबाबदारीमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक बँकेला आपल्या ग्राहकांच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. संशयास्पद व्यवहार आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ला कळवणे गरजेचे केले आहे. या नियमांमुळे बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक व विश्वसनीय होण्यास मदत मिळणार आहे.
नवीन नियमांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची दखल घेणे गरजेचे आहे
1) बँक खात्यांचा वापर केवळ वैध व कायदेशीर कारणांसाठीच करण्यात यावा.
2) प्रत्येक व्यवहाराची योग्य नोंद ठेवावी.
3) संशयास्पद व्यवहार आढळून आले तर त्वरित बँकेला कळवावे.
4) खात्यांची नियमितपणे तपासणी करत राहावी.
५) अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करणे टाळावे.
रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम हे भारतीय बँकिंग क्षेत्राच्या सुरक्षिततेकरिता एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. या नियमांमुळे एकीकडे ग्राहकांचे हित जपले जाणार आहे, तर दुसरीकडे बँकिंग प्रणाली अधिक मजबूत होणार आहे.