नमस्कार मित्रांनो सध्या महिलांकडून लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज सादर केले जात आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू असल्यामुळे महिलांना अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या योजनेंतर्गत शासनाने तीन वेळा नवीन शासकीय आदेश (GR) निर्गमित करून योजनेंत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
Saving Bank Account बाबत सूचना
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना महिलांनी आपल्या आधार कार्डाशी लिंक असलेले बँक खातेच नमूद करणे आवश्यक आहे. कारण या योजनेच्या लाभाची रक्कम थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणूनच आधारशी लिंक असलेले खाते देणे अनिवार्य आहे. आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स अनुसरा
आधार-बँक खाते लिंकिंग स्थिती तपासण्याची प्रक्रिया
1) आधारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
2) माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.
3) ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा निवडा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा वर क्लिक करा.
5) तुमचा आधार क्रमांकआणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
6) त्यानंतर तुम्हाला आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी प्रविष्ट करा.
याप्रमाणे सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे ते स्क्रीनवर दिसेल.
ही माहिती तुम्हाला योग्य ते बँक खाते अर्जात नमूद करण्यासाठी उपयुक्त ठरेल.