नमस्कार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 अनुदान स्वरूपात दिले जाते. हे अनुदान तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
पीएम किसान लाभार्थी यादी जाहीर
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठी सरकारने लाभार्थी यादी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना ही यादी तपासून आपले नाव आहे की नाही हे जाणून घ्यावे लागेल. यादीत नाव असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळेल.
ऑनलाइन यादी कशी तपासावी?
पीएम किसान लाभार्थी यादी भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. यादी तपासण्यासाठी खालील प्रक्रिया करा.
1) PM Kisan अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2) पृष्ठावरील लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
3) तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव यांची माहिती भरून पुढे जा.
4) यानंतर तुम्हाला यादी दिसेल.
5) यादी डाउनलोड करून किंवा ऑनलाईन तपासून तुमचे नाव आहे का ते पाहा.
पीएम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ओळखपत्र (जसे की मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- जमिनीशी संबंधित कागदपत्रे
महत्त्वाची टीप
जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल, तर लवकरात लवकर नोंदणी करा. योजनेची माहिती आणि नोंदणी प्रक्रिया अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.