भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये डिजिटल व्यवहारांचा खूप जास्त विस्तार होत आहे यामुळे बँकिंग क्षेत्रात सुरक्षितता व पारदर्शकता राखणे गरजेचे झाले आहे याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यानुसार सर्व बँक खातेधारकांसाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत KYC अपडेट करणे बंधनकारक केले आहे.
गेल्या काही वर्षांत बँकिंग क्षेत्रात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँक खाती उघडणे , काळ्या पैशांचे व्यवहार तसेच दुसऱ्याच्या खात्याचा गैरवापर करणे अशा समस्या वाढल्या आहेत या प्रकारांना आळा घालण्यासाठी RBI ने KYC अपडेट करणे अनिवार्य केले आहे.
KYC प्रक्रिया म्हणजे काय ?
KYC (Know Your Customer) म्हणजे बँक ग्राहकांची ओळख सत्यापित करण्याची प्रक्रिया
नियमित KYC अपडेट केल्यास काय होते ?
1) ग्राहकांची माहिती अद्ययावत होते
2) बनावट बँक खात्यांवर योग्य नियंत्रण ठेवता येते
3) आर्थिक गुन्हेगारी रोखण्यास मदत होते
4) ग्राहकांच्या खात्यातील पैसे अधिक सुरक्षित राहतात
कोणत्या खात्यासाठी KYC करणे गरजेचे आहे ?
1) बचत खाते (Saving Account)
2) चालू खाते (Current Account)
3) मुदत ठेव खाती (Fixed Deposit Accounts)
4) व्यावसायिक खाती (Business Accounts)
5) सहकारी आणि लघुवित्त बँक खाती
KYC अपडेटसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड (अनिवार्य)
2) पॅन कार्ड (अनिवार्य)
3) सध्याचा राहत्या पत्त्याचा पुरावा
4) नवीन पासपोर्ट साईझ फोटो
5) व्यवसाय/नोकरीचा पुरावा (जर लागू असेल तर)
KYC अपडेट न केल्यास काय होईल?
1) 1 फेब्रुवारी 2025 पासून खाते निलंबित केले जाईल
2) ऑनलाइन बँकिंग सेवा बंद केली जाईल
3) डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहार थांबवले जातील
चेक बुक सुविधा मिळणार नाही
KYC अपडेट कसे करावे?
1) बँकेच्या शाखेत जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑफलाईन / ऑनलाईन फॉर्म भरावा
2) ऑनलाइन पद्धतीने – नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे अपडेट करा
3) व्हिडिओ KYC – काही बँका व्हिडिओ कॉलद्वारे KYC अपडेटची सुविधा देतात
महत्त्वाच्या सूचना
1) KYC अपडेट करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही
2) बँकेचे अधिकारी कधीही फोनवर पासवर्ड किंवा OTP संबंधी माहिती विचारत नाहीत
3) फसवणुकीच्या कॉल्सना प्रतिसाद देऊ नका
4) केवळ अधिकृत माध्यमांनी KYC अपडेट करा