महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (माहाबोसीडब्ल्यू) बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.आजच्या या लेखात आपण या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
बांधकाम क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणाकरीता व त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याकरीता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. MAHABOCW ने ३२ विविध प्रकारच्या योजना राबवून बांधकाम कामगारांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
नोंदणी पात्रता
1) किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे
2) उमेदवाराचे वय १८ ते ६० वर्षे असावे
3) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
4) बांधकाम क्षेत्रातील सक्रिय कामगार असावा
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रहिवासी दाखला
3) बँक खाते पासबुक
4) पॅन कार्ड
5) पासपोर्ट फोटो
6) कामाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1) MAHABOCW च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करता येते.
1) वेबसाइटवर नोंदणी करावी
2) व्यक्तिगत माहिती भरावी
3) आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे
4) नोंदणी शुल्क भरावे
5) अर्जाची स्थिती तपासावी
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळण्यास मदत होत आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी व कामगारांचा सक्रिय सहभाग यामुळे बांधकाम क्षेत्राचा विकास गतीने होत आहे.