मंडळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, ती आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मागणी क्रमांक-X-1, मुख्य लेखाशिर्ष २२३६ (पोषण आहार) अंतर्गत जानेवारी २०२४ महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देते. यासाठी विवरणपत्रातील रकाना क्रमांक-२ मधील लेखाशीर्ष/उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक-८ प्रमाणे एकूण ३६ कोटी रुपये वितरित व खर्च करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
महाराष्ट्र कारागृह (संचित रजा आणि अभिवचन रजा) नियम, २०२४ अंमलबजावणी
कारागृह अधिनियम, १८९४ च्या कलम ५९ (५) व (२८) नुसार महाराष्ट्र कारागृह (संचित रजा आणि अभिवचन रजा) नियम, २०२४ लागू करण्यात आले आहेत. हे नवीन नियम महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित रजा व अभिवचन रजा) नियम, १९५९ चे अधिक्रमण करतात. नवीन नियम दिनांक ०२ डिसेंबर २०२४ पासून अंमलात आले आहेत. त्यामुळे या तारखेला प्रलंबित असलेल्या संचित व अभिवचन रजेच्या प्रकरणांना महाराष्ट्र कारागृह (संचित व अभिवचन रजा) नियम, २०२४ लागू राहील.
या संदर्भातील अधिसूचनेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०२०५१६१००५६२२९ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग – पदोन्नती आदेश (२०२३-२४)
राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक आयुक्त (गट-ब) संवर्गात पदोन्नती देण्यात येत आहे. ही पदोन्नती २०२३-२४ च्या नियमित निवडसूची अंतर्गत करण्यात आली आहे. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची त्याच्या नावासमोर निर्दिष्ट ठिकाणी पदस्थापना करण्यात येईल.