Ayushman Bharat yojna नमस्कार मित्रांनो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र नागरिकांना 5 लाख रुपये पर्यंतचे आरोग्य विमा कवच दिले जाते. या लेखात आपण पाहणार आहोत की आयुष्मान कार्डसाठी अर्ज कसा करावा आणि कोणाला याचा लाभ मिळू शकतो.
PM Mudra Loan : या योजनेअंतर्गत मिळेल 20 लाखापर्यंत कर्ज , असा करा अर्ज
कोण पात्र आहे?
सरकारच्या माहितीनुसार 30 जून 2024 पर्यंत 34.7 कोटी आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले आहेत, आणि सुमारे 7.37 कोटी नागरिकांना या योजनेतून मोफत उपचार मिळाले आहेत. आता 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, जरी ते कोणत्याही श्रेणीतील असले तरी त्यांना हे आरोग्य कवच मिळेल. तसेच, विद्यमान लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप कवच दिले जाणार आहे ज्यामुळे त्यांना आणखी मदत मिळू शकेल.
सरकारचे उद्दिष्ट
आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देणे. यामध्ये अंदाजे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होतो. या योजनेद्वारे कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा कवच मिळते, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मोठ्या प्रमाणात आधार मिळू शकतो.
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४००० रुपये, पहा तुमचे नाव यादीत तर नाही ना
अर्ज कसा करावा?
मित्रानो खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही आयुष्मान भारत योजनेत अर्ज करू शकता.
1) सर्वप्रथम https://abdm.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) आधार कार्ड किंवा रेशन कार्ड वापरून PMJAY कियोस्कवर आपली पात्रता सत्यापित करा.
3) कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करून आवश्यक माहिती भरा.
4) शेवटी, AB-PMJAY आयडीसह आपले ई-कार्ड प्रिंट करून घ्या.
कार्ड ऑनलाईन बनवा घरी बसल्या
कुटुंबातील किती सदस्यांना मिळू शकतो लाभ?
मित्रानो सरकारने दिलेल्या निकषांनुसार कोणत्याही कुटुंबातील पात्र सदस्य आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकतात. एकाच कुटुंबातील कितीही सदस्यांना हा लाभ घेता येऊ शकतो, परंतु मित्रानो प्रत्येक सदस्य पात्र असणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळते.