नमस्कार मित्रांनो बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी योग्य पद्धतीने नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास किंवा एक्सपायर झालेल्या नोंदणीसाठी कामगारांना लवकरात लवकर नोंदणी सक्षम करून घ्यावी लागेल. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
पात्रता निकष
1) कामगाराची नोंदणी असावी.
2) नोंदणी एक्सपायर झालेली नसावी.
3) अर्जदार किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर कोणतेही पक्के घर नसावे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधीकारकडून मिळवलेले ओळखपत्र (अनिवार्य)
- आधार कार्ड
- सातबारा (जर जमीन असेल तर)
- बँक पासबुक
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे ई-मेल आयडी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येईल. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही दिलेल्या नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून भरू शकता आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जमा करू शकता.
योजनेचा उद्देश
1) सर्वसामान्य बांधकाम कामगारांना स्वतःचे घर मिळवून देणे.
2) गावात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
3) खेडेगावात या योजनेला अधिक महत्त्व देणे.
या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. अधिक माहिती आणि अर्जासाठी योग्य लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे.
आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.