मित्रांनो महाराष्ट्रात बहुतेक लोक शेतीवर अवलंबून आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी दरवर्षी वेगवेगळ्या योजना सुरू करत असतं. २०२५ मध्ये काही खास योजना आल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरू शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेमुळे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ६,००० रुपये टाकतं. यासाठी PM-KISAN पोर्टलवर नोंदणी करावी लागते.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) यामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी ५५% अनुदान मिळतं. म्हणजे तुमचं पाणी वाचतं आणि उत्पादन चांगलं येतं. अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून करायचा असतो.
पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं तर मदत मिळवण्यासाठी आहे. यामध्ये कमी पैशात विमा काढता येतो आणि नुकसान भरपाई लवकर मिळते. यासाठी गावातील कृषी कार्यालयात संपर्क करा.
उन्नत शेती – समृद्ध शेतकरी योजना शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देते. मोबाइल, मशीन, डिजिटल साधनं वापरून उत्पन्न वाढवता येतं.
शेतीसाठी सुविधा योजना म्हणजे कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिटसाठी अनुदान मिळवता येतं. यामुळे शेतमाल जास्त काळ टिकतो आणि चांगला भाव मिळतो.
मागेल त्याला शेततळे योजना पावसाचं पाणी साठवण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये शेतात तळे खोदण्यासाठी सरकारकडून मदत मिळते.
ऊस तोडणी यंत्र योजना मधून शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी मशीन घेता येतं आणि त्यासाठी ५०% अनुदान मिळतं.
फार्महाऊस कर्ज योजना शेतात घर बांधण्यासाठी कमी व्याजदरावर कर्ज मिळतं. हे बँक ऑफ महाराष्ट्रकडून मिळतं.
फळबाग लागवड योजना जशी आंबा, पेरू, चिकू यासाठी आहे. यामध्ये झाडं लावण्यासाठी अनुदान दिलं जातं. यासाठी ग्रामसभेत नोंदणी करावी लागते.
अर्ज कसा करावा?
- महाडीबीटी पोर्टलवर जा
- PM-KISAN पोर्टल वापरा
- जवळच्या कृषी कार्यालयात किंवा बँकेत भेट द्या
या योजना वापरल्या तर शेतीत फायदा होतो. तुमचं उत्पन्न वाढू शकतं आणि संकटात सरकारकडून मदतही मिळू शकते. त्यामुळे योजना माहिती ठेवून त्यांचा योग्य उपयोग करा!