शेतकरी मित्रांनो नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले. त्यांनी शेतीसंबंधी मुद्द्यांवर चर्चा केली आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, आपल्या देशात एक देश एक कर या संकल्पनेनुसार GST कर प्रणाली लागू केली गेली आहे. या प्रणालीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांनी केंद्रीय GST परिषदेतून खते, बियाणे, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक इतर वस्तूंना GST मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
त्यांनी विशेषता शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंवरील GST कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची वचन दिली. शेतकऱ्यांना त्यांची शेतीसंबंधी वस्तू कमी किमतीत मिळाल्या तर त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, ज्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकेल. यासाठी ते केंद्र सरकारशी तडजोड करण्याचे आश्वासन देत आहेत.