मंडळी एअरटेल ही भारतातील एक अग्रगण्य टेलिकॉम कंपनी असून, आपल्या ग्राहकांसाठी सतत नवे आणि उपयुक्त प्लान्स आणत असते. अलीकडेच कंपनीने परदेश प्रवास करणाऱ्यांसाठी एक नवीन इंटरनॅशनल रोमिंग प्लान बाजारात आणला आहे. या प्लानमुळे परदेशात असतानाही युजर्सना सहज इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या नव्या प्लानअंतर्गत, एअरटेल १८९ देशांमध्ये अनलिमिटेड हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे. विशेष म्हणजे, युजर्स परदेशात उतरल्यावर हा प्लान आपोआप सक्रिय होतो आणि विमानप्रवासातही नेटवर्कशी संपर्क टिकून राहतो.
ग्राहकांना २४ तास ग्राहकसेवेचा लाभ मिळणार असून, कंपनीने या प्लानमध्ये दरवर्षी आपोआप नूतनीकरणाचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. या प्लानची किंमत ४,००० रुपये असून एक वर्षासाठी वैध असेल. प्लानमध्ये परदेशात ५ जीबी हाय-स्पीड डेटा, १०० मिनिट कॉलिंग आणि १०० एसएमएसचा समावेश आहे. भारतात असताना या प्लानचा रिचार्ज केल्यास युजर्सना १.५ जीबी डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, तसेच रोज १०० एसएमएस पाठवण्याची मुभा असेल.
या प्लानमुळे परदेशात स्थानिक सिमकार्ड घेण्याची गरज भासत नाही आणि तो तुलनेत अधिक किफायतशीर ठरतो. युजर्सना डेटा आणि कॉलिंग वापर तपासण्यासाठी, बिलांचे तपशील पाहण्यासाठी आणि अधिक डेटा किंवा कॉलिंग मिनिट्स खरेदी करण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपचा वापर करता येईल. तसेच रिचार्जसाठी एअरटेल थँक्स अॅपसह पेटीएम, गुगल पे यांसारख्या इतर प्लॅटफॉर्म्सचाही उपयोग करता येऊ शकतो.