मंडळी जर तुम्ही विमानाने प्रवास करण्याची योजना करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने आपली पहिली अॅप फेस्ट ऑफर जाहीर केली आहे, ज्यामध्ये एअर इंडियाच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे (iOS आणि Android) फ्लाइट बुक करताना विविध सूट आणि फायदे मिळू शकतात. यामध्ये विमान तिकिटांसह इतर सुविधांवर देखील मोठ्या प्रमाणावर सवलती मिळणार आहेत.
एअर इंडिया अॅप फेस्ट ऑफर १५ जानेवारी २०२५ पासून दुपारी १२:०१ वाजता सुरू होऊन २१ जानेवारी २०२५ पर्यंत रात्री ११:५९ वाजेपर्यंत चालेल. या दरम्यान, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या तारखांवर कोणतेही बंधन न ठेवता फ्लाइट बुकिंगवर २०% पर्यंत सूट मिळवता येईल.
प्रोमो कोड वापरून १०% पर्यंत सूट प्रवासी एअर इंडिया मोबाइल अॅपद्वारे बुकिंग करताना प्रोमो कोड APPFEST वापरून सर्व-समावेशक भाड्यावर १०% पर्यंत सूट मिळवू शकतात.
एअर इंडिया अॅप फेस्ट दरम्यान, प्रवासी मोबाइल अॅपद्वारे बुकिंग करतांना सुविधा शुल्कातून ३९९ रुपये वाचवू शकतात.
तसेच एअर इंडियाने प्रवाशांसाठी विविध पेमेंट ऑफर्स आणि सवलती देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक बँक ऑफरची वैधता वेगवेगळी असू शकते. ही ऑफर एअर इंडिया मोबाइल अॅपसोबतच अधिकृत वेबसाइटवरही उपलब्ध आहे. अॅप फेस्ट कोड वापरून प्रवासी सवलत मिळवू शकतात, तसेच HDFC बँक, ICICI बँक, फेडरल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या कार्डांवर उपलब्ध असलेल्या पेमेंट ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.