नमस्कार मित्रांनो! आज आपण आधार कार्डवरील फोटो बदलण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. अनेक लोकांनी आपल्या आधार कार्डचा फोटो बदललेला आहे. या लेखात दिलेल्या माहितीनुसार, तुम्हीही तुमच्या आधार कार्डवरील फोटो सहजपणे बदलू शकता.
फोटो बदलण्याची प्रक्रिया
आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी, तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया करावी लागेल. इंटरनेटवर काहीजण सांगतात की फोटो ऑनलाइन बदलता येतो, परंतु हे खरे नाही. त्यामुळे, फोटो बदलण्यासाठी खालील पायऱ्या अनुसरा:
1) तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा संगणकावर UIDAI (Unique Identification Authority of India) च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) मुख्य पृष्ठावर डाव्या बाजूला MY Aadhaar हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) Book My Appointment या पर्यायावर क्लिक करून, तुमच्या शहर आणि स्थानानुसार अपॉइंटमेंट बुक करा.
4) बुक केलेली अपॉइंटमेंट घेऊन, आधार सेवा केंद्रात जा. तिथे तुम्हाला आधार क्रमांक, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सोबत आणावा लागेल.
5) आधार सेवा केंद्रावर तुम्हाला फोटो बदलण्यासाठी फॉर्म दिला जाईल. तो योग्य माहितीने भरून द्या.
6) आधार सेवा केंद्रात तुम्हाला बायोमेट्रिक सत्यापनासाठी फोटो, फिंगरप्रिंट आणि डोळ्याचे स्कॅनिंग करण्यात येईल.
7) फोटो अपडेट करण्यासाठी ₹100 ची फी लागेल, जी तुम्हाला सेवा केंद्रातच भरावी लागेल.
8) प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक अपडेट स्लिप दिली जाईल, ज्यामध्ये Update Request Number (URN) असेल. या नंबरद्वारे तुम्ही ऑनलाइन स्थिती तपासू शकता.
9) फोटो अपडेट होण्यासाठी साधारणता 2 ते 3 आठवडे लागतात. तुम्ही UIDAI च्या वेबसाईटवर किंवा mAadhaar ॲपद्वारे तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासू शकता.
10) UIDAI च्या वेबसाईटवर Check Aadhaar Update Status या पर्यायावर क्लिक करून तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासा. अपडेट झाल्यानंतर तुम्ही आधार कार्डाची नवीन डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता.
मित्रानो याप्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील फोटो सहजपणे बदलू शकता.