नमस्कार आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ओळखपत्र आहे. कोणत्याही शासकीय किंवा खासगी व्यवहारांसाठी, आधार कार्डची आवश्यकता असते. बँक खाते उघडणे, सिम कार्ड खरेदी करणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे यांसारख्या विविध कारणांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्डशी संबंधित काही फसवणुकीचे प्रकार सध्या वाढले आहेत.
अनेकदा दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या आधार कार्डचा दुरुपयोग झाल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे, आपले आधार कार्ड सुरक्षित आहे का आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होत नाही ना, हे तपासणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आपण घरबसल्या सहज करू शकतो. यामुळे भविष्यातील आर्थिक किंवा व्यक्तिगत नुकसान टाळता येऊ शकते.
तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे झाला आहे हे जाणून घेण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
1) सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत माय आधार पोर्टलवर जा.
2) तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड एंटर करा. ओटीपी मिळवण्यासाठी लॉगिन बटणावर क्लिक करा.
3) नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा.
4) ऑथेंटीकेशन हिस्ट्री हा पर्याय निवडा आणि तपासायच्या कालावधीची तारीख निवडा.
5) येथे तुम्हाला तुमच्या आधारचा वापर कुठे झाला आहे याची सविस्तर माहिती मिळेल.
जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद माहिती आढळली तर १९४७ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा तुमची तक्रार [email protected] या ईमेलवर पाठवा.
वरील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आधार कार्डचा अयोग्य वापर झालेला आहे का, हे तपासू शकता. संशयास्पद बाबींची माहिती मिळाल्यास तत्काळ UIDAI च्या मदतीचा लाभ घ्या.