महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे या योजनेचे नाव आहे महिला किसान योजना. ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याकरिता ही योजना विशेष महत्त्व देते. या योजनेमार्फत पात्र लाभार्थी महिलांना ५० हजार रुपयांपर्यंत पैसे उपलब्ध करून दिले जातात, ज्यामुळे त्यांना शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यास मदत होते.
या योजनेची ठळक वैशिष्ट्ये
महिला किसान योजनेचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे एकूण ५० हजार रुपयांच्या अर्थसहाय्यापैकी १० हजार रुपये हे थेट अनुदान म्हणून दिले जात असतात. उर्वरित रक्कम ही कर्जाच्या स्वरूपा मध्ये उपलब्ध करून दिली जाते. हे कर्ज अत्यंत कमीत कमी अशा वार्षिक ५ टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश्य हा आहे की हे कर्ज फक्त शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठीच वापरता येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे
1) अर्जदार महिला ही चर्मकार समाजातील महिला असणे
2) अर्जदार महिलेच्या नावे किंवा तिच्या पतीच्या नावे सातबारा उतारा असणे गरजेचा आहे.
3) पती-पत्नी दोघांच्या संयुक्त नावावर असलेला सातबारा देखील स्वीकार करते
4) पतीने प्रतिज्ञापत्राद्वारे पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज घेण्यास संमती देणे गरजेचे आहे
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे
१) विहित नमुन्यातील अर्ज
२) उत्पन्नाचा दाखला
३) जात प्रमाणपत्र
४) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
५) रहिवासी दाखला
६) कच्च्या मालाचे दरपत्रक
७) व्यवसायाच्या जागेसंबंधी कागदपत्रे
८) व्यवसायासाठी आवश्यक परवानगी
९) दोन जमीनदारांचे संमतीपत्र
१०) अर्जदाराचे दोन अलीकडील छायाचित्र
महिला किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा. सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावा. जिल्हा कार्यालयातील अधिकारी या योजनेबद्दल सविस्तर माहिती देतात आणि अर्ज प्रक्रिये विषयी योग्य ते मार्गदर्शन करतात