मित्रांनो नमस्कार राज्यातील एका जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांना थेट 350 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाला आहे. या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता हा 350 कोटी रुपये अग्रीम विमा म्हणून दिला जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे, ते आपण सविस्तरपणे समजून घेऊ.
जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा संदर्भात आदेश आणि सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा रक्कम देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
साडेसात लाख शेतकऱ्यांना या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 350 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे पिकांच्या नुकसानीमुळे होणारा आर्थिक फटका टाळता येईल.
परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले होते. याबाबतचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आता पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% विमा रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्ह्यातील 7 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यांना 25% अग्रीम विमा रक्कम जवळपास 3.5 कोटी रुपयांच्या आसपास मिळेल. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात एका महिन्याच्या आत जमा होईल अशी माहिती देण्यात आली आहे.