नमस्कार मित्रांनो जून ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्ततेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला आणि अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनली. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने २९२० कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे.
शासनाने यासाठी नवीन जीआर (गझेट नोटिफिकेशन) जारी केले आहे. या नवीन जीआरनुसार राज्यातील चार प्रमुख विभागांमधील २२ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
नुकसान भरपाईची रक्कम आणि वितरण प्रक्रिया
जीआरनुसार १ जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टर (३ एकर) पर्यंत मदतीची रक्कम दिली जाणार आहे. तसेच, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीव्हीडी (डायरेक्ट बेन्फिट ट्रांसफर) प्रणालीच्या माध्यमातून थेट जमा केली जाईल.
नुकसान भरपाई मिळवणाऱ्या जिल्ह्यांची सूची
या नुकसान भरपाईसाठी जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, लातूर, सातारा, सोलापूर, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच, नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार आहे.
मंजूर निधीचे वितरण
राज्य सरकारने प्रत्येक विभागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे.
- छत्रपती संभाजी नगर विभाग – २७३८ कोटी ८२ लाख रुपये
- नागपूर विभाग –१११ कोटी ४१ लाख रुपये
- नाशिक विभाग – ८ कोटी ९४ लाख रुपये
- पुणे विभाग – ६१ कोटी ६० लाख रुपये
यामुळे प्रभावित शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.