सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात आणि या योजनांमुळे नागरिकांच्या आयुष्य सुखद बनावे हा शासनाचा प्रयत्न असतो. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अवघड झाले आहे तसेच आरोग्य विषयक समस्यांमध्ये वाढ झालेली आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये सरकारकडून दोन लाखांचा आरोग्य विमा जाहीर करण्यात आलेला आहे.
भारत सरकारने 2015 मध्येच ही योजना सुरू केलेली आहे परंतु आत्तापर्यंत राज्यातील बऱ्याच नागरिकांना या योजनेची माहिती नाही त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. संबंधित योजनेमध्ये भारत सरकारकडून फक्त वीस रुपयांमध्ये वर्षभरासाठी दोन लाख रुपयांचा विमा जाहीर करण्यात आला आहे ज्यामध्ये गंभीर दुखापत किंवा अपघाती मृत्यू झाला तर आपण हा विमा क्लेम करू शकतो.
भारत सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या या विमा योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि या योजनेमध्ये आपण वर्षाला वीस रुपये भरून दोन लाख रुपयांपर्यंतचा क्लेम प्राप्त करून घेऊ शकतो. 18 ते 70 वर्षे वयोगटातील भारत देशातील कोणताही नागरिक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये भाग घेऊ शकतो आणि त्यानंतर दरवर्षी त्याच्या खात्यामधून वीस रुपये डेबिट केले जातील.
या विमा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे जर अपघातामध्ये तुमचा कोणताही शरीराचा भाग विकलांग झाला तर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचा क्लेम देण्यात येतो तसेच जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर दोन लाख रुपयांपर्यंतचा क्लेम प्राप्त होतो. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनांमध्ये अर्ज करण्याची पद्धती खूपच सोपी आहे यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये अर्ज करू शकाल.
योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ऑफिशियल वेबसाइटवरून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म डाऊनलोड करा आणि त्या फॉर्म वरती योग्य माहिती भरून तसेच आवश्यक दस्तावेजंसह तो फॉर्म बँकेमध्ये जमा करा त्यानंतर दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून वीस रुपये कट केले जातील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ प्राप्त होईल.