नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) बोर्ड परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. जे विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट https://mahahsscboard.in वर जाऊन आपले वेळापत्रक तपासावे.
इयत्ता 10वी परीक्षा वेळापत्रक (SSC)
दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होऊन 17 मार्च 2025 रोजी संपेल.
- पहिली शिफ्ट — सकाळी 11:00 ते दुपारी 2:00
- दुसरी शिफ्ट — दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:00
इयत्ता 12वी परीक्षा वेळापत्रक (HSC)
बारावीची सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होऊन 11 मार्च 2025 रोजी संपेल.
- पहिली शिफ्ट — सकाळी 11:00 ते दुपारी 2:00
- दुसरी शिफ्ट — दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:00
हे सुद्धा वाचा
महत्त्वाची सूचना
- दहावीच्या गणित व विज्ञान या विषयांसाठी प्रचलित उत्तीर्णतेचे निकष लागू असतील. भविष्यात जर या निकषांमध्ये बदल झाला, तर त्याबाबत मंडळाकडून स्वतंत्र सूचना दिली जाईल.
- सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संबंधित घटकांनी ही माहिती नोंदवून ठेवावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि वेळापत्रकाचे पालन करण्याची खबरदारी घ्या. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा.