या मुलींना 1 लाख 1000 रुपये मिळणार , पहा कोणत्या मुली आहे पात्र

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
1 lakh 1000 rs to this girl

नमस्कार मित्रांनो या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना विशेष लाभ दिला जाईल. या योजनेला 19 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, नवी मुंबई यांनी 36 जिल्ह्यांना ₹119.70 कोटींचा निधी वितरित केला आहे.

या योजनेच्या अंतर्गत, 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना विविध प्रकारचे लाभ मिळतील. जिल्हा आणि तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन केले जात असून, 35,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी 15 दिवसांत शिबिरांचे आयोजन करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

योजनेतून किती लाभ मिळणार

  • मुलीच्या जन्मानंतर ₹5,000
  • इयत्ता पहिलीत ₹6,000
  • सहावीत ₹7,000
  • अकरावीत ₹8,000
  • वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹75,000

एकूण ₹1,01,000/- लाभार्थ्याला मिळेल.

लाभ मिळवण्यासाठी पात्रता

  • ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू आहे.
  • एक किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही हा लाभ मिळेल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी, आपल्याला आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज सादर करावा लागेल.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.